ग्रामपंचायत पुरस्कार : ग्रामपंचायतीला शासकीय स्पर्धा स्तरावर निर्मल ग्राम पुरस्कार, स्मार्ट व्हिलेज पुरस्कार संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार, सामाजिक सलोखा पुरस्कार, वनश्री पुरस्कार, कृषीथॉन आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार, अॅग्रोवर्ल्ड, माझी वसुंधरा अभियान, उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाले आहेत.
प्राथमिक विद्या मंदिर: इंग्रजकालीन प्राथमिक शाळा असलेल्या शाळेत अनेक विद्यार्थी यांनी शिक्षण घेऊन आज ते उच्च पदस्थ अधिकारी आहेत. आज शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू असून सोलर, शौचालय पिण्याचा पाण्याची ,कंपोष्ट इ. आवश्यक सुविधा आहेत.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र : प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यावरणीय दृष्ट्या बांधकाम केले आहेत. सदर इमारतीवर सोलर लाइट , लावण्यात आलली असून डिजिटल पद्धतीने OPD चे कामकाज चालते. कोरोना काळात रुग्णांना सेवा देण्यात हे प्रा.आ.केंद्र आघाडी वर होते पंचक्रोशीतील रुग्ण / ग्रामस्थानसाठी २४ तास सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत देण्यात येते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाचे कायाकल्प पुरस्कार मिळालेले आहेत गावात सुसज्ज अभ्यासिका, मारुती मंदिर सभामंडप व रस्ते सिमेंट कॉँक्रिटकरण, भूमिगत विद्युतीकरण झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे.
शॉपिंग सेंटर: गावात १२ व्यापारी गाळे असून सदर गाळे लोकसहभागातून लिलाव पद्धतीने बांधकाम करून व्यवसायिकांना उपलब्ध करून दिले आहेत. सदर व्यापारी गाळ्यांचा वार्षिक भाड्यातून नियमित उत्पन्न मिळत आहेत.तसेच गावातीलच ग्रामस्थ तरुण वर्गास सदर गाळयांमध्ये व्यवसाय करत असल्याने रोजगार उपलब्ध होण्यास मदत झालेली आहे.
पाणीपुरवठा: जल मिशन योजने अंतर्गत गावात शुध्द पाणी पुरवठा व्हावा म्हणून २ पाण्याच्या टाक्या असून सकाळ-संध्याकाळ मुबलक पाणी पुरवठा केला जातो. गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना देखील मंजूर होऊन त्यांचे काम पूर्ण नवीन टाकीचे विहीरीचे काम पूर्ण झाल्याने मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे. आजपर्यंत गेल्या ५ (पाच) वर्षात एकही साथरोग नाही.
प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन:निरुपयोगी प्रदूषण करणारे प्लॅस्टिक ग्रा.प.मार्फत खरेदी करून त्याचे रीसायकलिंग केल जाते.
हगणदारी मुक्त गाव:घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघड्यावर शौच करणाऱ्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.
भूमिगत गटार: शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.
जल पुर्नभरण:जल पुर्नभरण(रेन वॉटर हार्वेस्टिंग)योजने अंतर्गत ग्रामस्थांना प्रबोधन केल्याने अनेक ग्रामस्थांनी आपल्या घरावर रेन हार्वेस्टिंग प्रणाली उभारली आहे.
गावतळे: गावच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन गावतळे असून त्यात मत्सल्यपालन व्यवसाय केला जातो त्यामधून ग्रामपंचायतीत निश्चित उत्पन्न मिळते.
अंगणवाडी : गावात 04 अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत आर.ओ पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात..
पशू वैद्यकीय दवाखाना : गावात पशू वैद्यकीय दवाखाना कार्यरत असून परिसरातील पशू चिकीत्सा व पशूपालन संदर्भात पशुपालकांना अवगत केले जाते. सदर सोलरद्वारे विद्युतपुरवठा होतो.
सभागृह : ग्रामपंचायत मार्फत गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय निर्मिती केली असून ग्रामस्थांना माफक दरात सेवा व सुविधा दिल्या जातात. ग्रामपंचायतीस निश्चित उत्पन्न दिले.
जल संधारण: गाव शिवारात नाले, ओहोळावर के.टी वेअर वनराई बंधारे बांधून पाणी आडवा,पाणी जिरवा संकल्पनेतून बंधारे निर्मिती केली असून वाहून जाणारे पाणी अडवून जलस्तर वाढवण्यास मदत झालेली आहे.
अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजना: अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजनाचा माध्यमातून हाय मास्ट लाईट, कॉँक्रीट रस्ते, भूमिगत विद्युतकरण आदी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
पारंपारीक रूढी बद्दल: नवरदेव मिरवणूक न काढणे, वरातीची प्रथा बंद, थोर पुरुषांच्या मिरवणूक बंद करून प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
डिजिटल पर्जन्यमापक: ग्रामपंचायतने अद्यावत डिजिटल पर्जन्यमापक बसवले असून त्यामुळे पडलेल्या पावसाची माहिती ग्रामस्थांना उपलब्ध होते.
ठळक वैशिष्ट्ये
१) ग्रामपंचायतकडे स्वत:च्या मालकीचे दोन टँकर आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच वृक्षारोपण आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमास माफक दरात पुरवठा केला जातो.
२) सर्व शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत सौरऊर्जा, पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर आहेत. आज अखेर विजबिल, कर्मचारी पगार देणे बाकी नाही. ग्रामपंचायत स्वयंपूर्ण आहेत.
३) गावात आठवडा बाजारपेठ आहेत
४) देवस्थान ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहेत. भाविकांचा भक्त तेथे असलेल्या दानपेटी मध्ये दान करतात त्यामधून ग्रामपंचायतीस देणगी स्वरुपात उत्पन्न मिळते.
५) गावातील तरुण तसेच दिव्यांग विधवा महिला तसेच इतर गरजू महिला व ग्रामस्थ यांना जागा भाड्याने दिले आहेत. त्यातून ग्रामपंचायतीस रोजगार उपलब्ध होऊन ग्रामपंचायतीस जागाभाडे रूपाने उत्पन्न मिळते.
६) गावातील गावततले , पाझरतलाव यामध्ये मत्स्यपालन व्यवसाय केला जात असल्याने त्यामधून ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळते. व रोजगार देखील उपलब्ध केला आहे.